Posts

करोना आणि आम्ही ऑस्ट्रेलियन

Image
माझं घर आहे ऑस्ट्रेलियाच्या  राजधानीमध्ये म्हणजेच कॅनबेरा मध्ये. मी शाळेत लायब्ररीअन आहे आणि वीकेंडला कत्थक  डान्सस्कुल चालवते. कम्युनिटी रेडिओवर मी रेडिओ जॉकी म्हणूनही काम करते. दोन दहा वर्षाच्या आतील मुलांची आई पण आहे. त्यामुळे माझा दिवस हा नेहमीच विमानाचे पंख लावल्यासारखा.  करोनाचा झटका खरंतर पचनी पडणारा नव्हताच माझ्या. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच स्कॉट मॉरिसनच्या ऑस्ट्रेलियन सरकारने दक्षता घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा आम्हाला ऑस्ट्रेलियनना ती बंधनं पचणारी नव्हतीच. तशीही बंधनं कोणाला हवी असतात. आम्ही लॉक डाउनच्या पहिल्या फेज मध्ये होतो. आमच्या शाळा पुपील फ्री करण्यात आल्या. म्हणजे शाळेत मुलांना पाठवायचं कि नाही हा निर्णय पालकांचा. पण शाळा चालू ठेवल्या होत्या प्रत्येक इसेन्शिल वर्कर साठी. आणि जो पगार घेतो आणि स्वतःचा उदर्निवाह करतो तो प्रत्येक जण इसेन्शिअल कामाच्या यादीतला.  पहिल्यांदा आम्हाला मॉरिसन सरकारचा खूप राग आलेला पण आता त्याच्या गोष्टी काहीप्रमाणात पटल्याहि. कोविड१९ चे चटके जगाच्या इकॉनॉमीला बसण्या आधीच ऑक्टोबर १९ पासून ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी होरपळून निघत ह

असाही एक स्वातंत्र्यदिन......

Image
आजची सकाळ काही अफलातून वेगळी वाटली मला... कधी नव्हे ते मी २६ जानेवारीला मी खऱ्या अर्थाने सुट्टी एन्जॉय करायचं ठरवलं आणि म्हटलंआज पांघरुणात लोळत न पडता घराच्या बाहेर पडून एकटंच सव्वीस जानेवारी एन्जॉय करायचा... नवऱ्याचा आळस रंगात आलेला; मुलं सुस्तावलेलीम्हणजे हाच तो क्षण होता जो माझा "मी टाईम" होता... मस्त चहा आणि लोणीपाव खाऊन मी निघाले. खरं तर लोणीपाव आणि चहा आयुष्यातूनसुटून एक तप लोटल्यात जमा आहे आणि जेव्हा दीक्षित आणि दिवेकर तुमच्या कॅलरीज आणि पोटाचे इंच आपल्याकडूनच कचाकच मोजून घेतअसतांना हे असं सगळं खाणं म्हणजे चैन असते फक्त... तरी आज काहीतरी वेगळी सकाळ साठवायची होती म्हणून मी निघाले ते पण चक्क चालत... कुठे जायचंय असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरवायचं हि नसतं  खरंतर... वाट फुटेल तिथे आणि पाय नेतील तिथे जायचा आज बेत आखला... सकाळी ७ ची वेळ होती... नुकतीच उजाडल्यासारखी... सुट्टीमुळे रस्ताही आळसावलेला होता... तुरळक टाळकी वावरत होती... त्यात पण २-३ रिक्षेवाले, एखादा दूधवाला सायकलवर आणि एखादा पेपरवाला तेवढा दिसला... बाकी त्या रस्त्याची शान असलेली एक दोन कुत्री इथे तिथे लोळत.

आमूला पत्रे क्रमांक ११

Image
प्रिय आमुस, तुझा सहा महिने ते एक वर्षाचा काळ फार सुंदर होता आमच्या आयुष्यातला... तुझे हळू हळू रांगणे, तुला दुधापेक्षा काहीतरी वेगळे खाण्याची आवड होणे ह्या सगळ्याच गोष्टी बघतांना एक गम्मत यायची बघ. पण तुम्ही छोटी बाळं किती भरभर मोठी होत जाता रे... आता एवढासा म्हणेपर्यंत वर्षाचा होत पण आलेलास तू... तू जसा सात एक महिन्याचा झालास तसे तुला नुसते दूध किंवा खीमट मुळी आवडेनाच. मग तुला आमच्या बरोबर जेवायला बसायचे असायचे. आम्ही तुला इकडच्या प्रथेप्रमाणे हाय-चेअर घेऊन आलो आणि मग तू त्यात बसून कधी उकडलेले गाजर, उकडलेला बटाटा खाऊ लागलास. तसे दात जरी आलेले नसले तरी तुला आमच्या सारखे जेवायची घाईच होऊन गेलेली. आणि मग तू त्यासाठी हट्ट करायचास. एकदा तुला सुपर मार्केट मधे घरचे सामान आणायला मी घेऊन गेले... तू ट्रॉलीमधे बसून इकडचे तिकडचे पदार्थ बघत होतास. त्यात तुला मस्त लाल चुटूक टोमॅटो आणि सफरचंद दिसले. तू हट्टच धरून बसलास की मला आत्ताच्या आत्ता ते दे... तू काही केल्या ऐकेना आणि सगळे माझ्या कडेच बघायला लागले..अश्या वेळी तुला चार चौघात एक लगवता पण येईना.

आमूला पत्रे क्रमांक १०

Image
प्रिय आमुस, तुझ्या बरोबर वेळ मस्त जायचा माझा... तू जवळ असलास की दुसरं काही करू नये आणि तुझ्याशी नुसतं खेळत रहावं. तू माझी एक सुंदर गरज भागवली होतीस खरं तर. तू माझा मित्र झाला होतास... तुला वाटेल आई असे काय म्हणतेय एक सहा महिन्याचं मूल कोणाचं मित्र कसं असू शकेल ... पण खरं तर मैत्री साठी कुठलीच मर्यादा नसते ना रे... मित्र म्हणून एक गोष्ट सांगते बघ तुला...माझी कामावर एक मैत्रिण होती...इकडची बरे का... गोरी मैत्रिण...तिचे नाव महत्वाचं नाहीए... तसं तू तिला ओळखत असलास तरी... तरी सोयीसाठी यमू लिहिते ..तर ही यमू माझ्या पेक्षा वयाने थोडी मोठी होती... आम्ही नेहमी गप्पा मारत असू. तिला ३ मुले होती... एक १२ -१३ वर्षाचा; दुसरा ७ वर्षाचा आणि तिसरा साधारण तुझ्या वयाचा होता तेव्हा; म्हणजे वर्षाचा असेल बघ. तिला पाहिले मूल १८-१९ व्या वर्षी झालेलं... मग पटले नाही म्हणून दुसर्याशी लग्न आणि मग पुन्हा दोन मुले झाली यमू ला. आणि मग परत त्याच्याशी जमले नाही म्हणून फारकत आणि तो तिसरी बरोबर पसार... आणि आता ह्या यमूला एक तरुण मुलगा आवडतोय.... मला तिच्या मुलांची फार काळजी वाटते रे... त

आमूला पत्रे क्रमांक ९

Image
प्रिय आमुस, एक छोटं बाळ घरात असणं ही जितकी जबाबदारीची गोष्ट तितकीच एक क्षण विरंगुळ्याचीही गोष्ट असते बरं का.... आपल्या धकाधकीच्या जिवनापेक्षा बाळाचं निष्पाप जग किती वेगळं आहे हे फक्त काही क्षण त्याच्या निरागस चेहर्‍याकडे बघत राहिलो तरी कळतं.... तू ही आता साडे तीन महिन्याचा झालेलास आणि तुझा सहवास ही एक खूप छान गोष्ट होती माझ्या आयुष्यात चालू असलेली... तीन साडेतीन महिन्याचं बाळ दूध पीतांना, स्पर्शातून आईला परखत असतं बरे का.... आईच्या चेहर्‍यावर झालेले सूक्ष्म बदल सुद्धा बाळ नीट टिपत असतं....आई बाबांना एअरपोर्टला सोडून आले आणि घरी येऊन मला रडूच कोसळलं... आई होती तोपर्यंत एक मानसिक आधार वाटत होता... आता काही कोड कौतुकाचे दिवस राहिले नाहीत आणि जबाबदारीचे दिवस आले हे कळून चुकलं... पण मला असं उदास झालेलं तुला ४ महिन्याच्या मुलाला जाणवलं आणि तुही त्यावेळी न रडता शांत माझ्या जवळ बसून राहिलास. आजी आजोबांचा तीन महिने सहवास तुझ्या ओळखीचा झाला होता.... आजी तुझ्याशी बोलायची तेव्हा तू हुंकारही द्यायचास त्यामुळेच की काय आजी आजोबा आज घरात दिसत नाहीत हे तुलाही जाणवलं होतं... २० तासाचा प्रवास करून

आमूला पत्रे क्रमांक ८

Image
प्रिय आमुस, आजच्या पत्रात मी तुला तुझ्या पहिल्या तीन महिन्याच्या घटना सांगणार आहे बरं का... तसा तू एक गुणी बाळ होतास म्हणजे मस्तीखोर नव्हतास असं काही मी म्हटलेलं नाहीए बरं का? मागच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे माझे आई बाबा तीन महिन्यासाठी आले होते आपल्याकडे. आई बाबा आले आणि मलाही तुझ्या सारखेच लहान व्हावंसं वाटायला लागलं... अचानक खूप थकवा आला आणि झोपून रहावं आणि आई कडून सगळे लाड पुरवून घ्यावेत असे होऊन गेलं होतं... कदाचित मनाबरोबर शरीरही शिथील होत चाललं होतं. आईने तिच्या सोबत खूप छान वस्तू आणल्या होत्या गवल्याची खीर, मेथीचे लाडू, हळीवचे लाडू, डिंकाचे लाडू ...वा मस्त... खरतर भारतात असतांना मला घरगुती खाण्याचं कधी अप्रूप वाटलच नाही बघ; पण आता मात्र त्याच घरगुती वस्तू फार जिव्हाळ्याच्या झाल्या होत्या. आईच्या हातचं आयतं गरम गरम खायला मिळत होतं; एकंदरीतच मीही चांगलं बाळसं घेत होते तुझ्या बरोबर... इथे अंग मालिश करायला बाळ बाळंतीनीसाठी सुईण मिळतच नाही म्हटल्यामुळे मालिश चे काम तुझ्या आजीवरच आलेले. तुझी आजी 3 महिनेच रहाणार होती त्यामुळे मला तुझी मालिश पण शिकू

आमूला पत्रे क्रमांक ७

Image
प्रिय आमुस, मी एका १५ दिवसाच्या बाळाची गोष्ट लिहितेय आणि आता ते बाळ चार वर्षाचं झालय….आणि बरं का आमू; मी लिहिलेलं ते सगळं वाचतय आणि त्यातून त्याला त्याच्या जन्मापासुनचं एक जग उलगडतय…..ही कल्पना किती मजेशीर आहे की नाही.... जसं मी तुला मागच्या पत्रात सांगितलं ना की; मी खूप खुशीत आले होते …. माझे आई बाबा येणार होते.... म्हणजे तुझे आजी-आजोबा …. अमू आई वडीलांसाठी मूल लहान असो की मोठं ते नेहमीच त्यांचे लहान बाळच असते बरं का... तसे मुलासाठी पण आई बाबा हे कुठल्याही वयात असलो तरी आपल्याला संभाळून घेणारे आई बाबाच असतात….ती अशी एक देणगी असते जिथे खोटे आणि दिखाऊ वागायची काही गरज नाही बघ ….अगदी बिनधास्त आपल्या मनात येईल ते वागावं, हट्ट करावेत आणि ते आई बाबांनी पुर्ण करावेत …. आता तुला हे विशेष सांगायची मला गरजच नाहीए खरतर; कारण तूला हे सगळं नीट ठाऊक आहे....म्हणूनच तर तुझे सगळे हट्ट माझ्या आणि बाबा समोर जोरदार चालू असतात …हो की नाही.....आणि आम्हालाही त्याची गम्मतच वाटते बरं का …. का सांगू; कारण आम्ही पण तेच केलय आमच्या लहानपणी …तुझ्या भूमिकेत असतांनाही आम्ही फार चांगले कलाकार