आमूला पत्रे क्रमांक १०

प्रिय आमुस, तुझ्या बरोबर वेळ मस्त जायचा माझा... तू जवळ असलास की दुसरं काही करू नये आणि तुझ्याशी नुसतं खेळत रहावं. तू माझी एक सुंदर गरज भागवली होतीस खरं तर. तू माझा मित्र झाला होतास... तुला वाटेल आई असे काय म्हणतेय एक सहा महिन्याचं मूल कोणाचं मित्र कसं असू शकेल ... पण खरं तर मैत्री साठी कुठलीच मर्यादा नसते ना रे... मित्र म्हणून एक गोष्ट सांगते बघ तुला...माझी कामावर एक मैत्रिण होती...इकडची बरे का... गोरी मैत्रिण...तिचे नाव महत्वाचं नाहीए... तसं तू तिला ओळखत असलास तरी... तरी सोयीसाठी यमू लिहिते ..तर ही यमू माझ्या पेक्षा वयाने थोडी मोठी होती... आम्ही नेहमी गप्पा मारत असू. तिला ३ मुले होती... एक १२ -१३ वर्षाचा; दुसरा ७ वर्षाचा आणि तिसरा साधारण तुझ्या वयाचा होता तेव्हा; म्हणजे वर्षाचा असेल बघ. तिला पाहिले मूल १८-१९ व्या वर्षी झालेलं... मग पटले नाही म्हणून दुसर्याशी लग्न आणि मग पुन्हा दोन मुले झाली यमू ला. आणि मग परत त्याच्याशी जमले नाही म्हणून फारकत आणि तो तिसरी बरोबर पसार... आणि आता ह्या यमूला एक तरुण मुलगा आवडतोय.... मला तिच्या मुलांची फार काळजी वाटते रे... तुझ्या सारखीच निष्पाप मुले रे ती... त्यांच्या वाढत्या वयात ते आई बाबाचा हा आबादुबीचा खेळ पाहून काय समजूत करून घेत असतील माहित नाही... तुला हे सगळे सांगितले कारण तू हा इथे ऑस्ट्रेलिया मधे जन्माला आलेला मुलगा... तुझ्या समोर ही संस्कृती नेहमीचीच की रे... आपल्या घराच्या दरवाजातून बाहेर पडलास की सगळीकडे हे लीव-इन चे मुखवटे... आणि कधी तुला हे कल्चर स्वीकारावसं वाटलं तर काय रे होईल माझ्या तेहेतीस कोटी देवांचं... त्याही पेक्षा तुझ्या बाबाच्या डोक्याचं जे मी पार भगुणे करून सोडिन त्याचे काय... असे भलते सलते विचार सारखे डोक्यात येऊन चैन पण पडत नाही बघ.... अमू असे वाटतं की सरळ निघून जावं आपल्या देशी रे बाबा.... हे आपल्याला नाही हो पचायचं आणि झेपायचं ही.... आपली संस्कृती फार प्राचीन आणि महान आहे बघ... अगदी सार्थ अभिमान करण्यासारखीच.... तू जन्माला कुठेही आलास तरी आपली भारतीय संस्कृती विसरू नकोस हो... तसा आज मी पत्रात तुझ्या डोक्यावरून वाहून जाणारच मुद्दा मांडलाय म्हणा पण मुद्दया पेक्षा माझी कळकळ लक्षात ठेऊन मोठा हो.... देश जरी हा स्वीकारला तरी संस्कृती आपलीच स्वीकारावीस तू हीच इच्छा आहे आमची... तुझी आई

Comments