Posts

Showing posts from 2019

आमूला पत्रे क्रमांक ६

Image
प्रिय आमुस, आज बरोब्बर आठ दिवसांनी तुला परत लिहायला घेतलं; म्हटलंकी आमु आत्ता कुठे वाचायला शिकतोय अश्यावेळी त्याला भरभरा पत्र लिहिली तर तो वाचेल का? मागच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे तीन दिवस हॉस्पिटल मधे राहून मला घरी सोडलं आणि आम्ही तुला तुझ्या घरी घेऊन आलो.... बाबाने पटकन घरात जाऊन भाकरी नसली तरी ब्रेडच्या तुकड्याने तुझी दृष्ट काढली आणि आपण दोघे घरात आलो... घर छान आवरून बसलं होतं....तुझ्यासाठी आणलेल्या छान छान खेळण्यांना त्यांची अशी एक जागा मिळालेली... आता आपल्या घरातली प्रत्येक वस्तू जणू काही तुलाच बघत होती... जणू तुमची एकमेकांशी खूप जुनी ओळख असावी... आता घरी आल्यानंतर एक महत्वाचं काम होतं ते म्हणजे तुझे बारसं. तसं तर जन्म झाल्या झाल्या हॉस्पिटल रेकॉर्ड्स साठी आम्ही तुझं नाव दिलंच होतं पण बारसे झाल्याशिवाय मज्जा नव्हती... आपल्या भारतात सगळ्यांचे कान टोचायची प्रथा आहे आणि त्यामागे शास्त्रही आहे बरं का.... पण इथे अशी काहीच पद्धत नव्हती ... आणि मोठया माणसांचे ईअर पियर्सींग तेवढे असते फॅशन म्हणून... त्यामुळे मला तुझे कान टोचताच आले नाहीत मुळी... ...

आमूला पत्रे क्रमांक ५

Image
प्रिय आमुस, ह्या आधीचं पत्र तू वाचलंस असशील एव्हाना.... त्या पत्रात तुझ्या जन्माची गोष्ट तुलाच सांगतांना मी पुन्हा एकदा ते क्षण जगले आणि आता फ्लॅशबॅक मधे जाऊन ते परत वाचतांना एक वेगळीच गम्मत वाटत होती बघ मला. तुझा जन्म झाला आणि तुझी नाळही कापण्याआधी त्यांनी तुला माझ्या अंगावर ठेवलं ...त्याक्षणी तुही ओळखीच्या स्पर्शाने शांत झालास.... तू कसं रे पटकन ओळखलंस की हा आईचा स्पर्श आहे.... बाबाने इंडिया मधे फोन करून घरी, नातेवाईकांना कळवलं. सगळ्यांचे फोन येत होते.... एक वेगळाच जल्लोष सुरु झाला तिथे....आजी आजोबा मामा मामी काका काकी आत्या मावशी असे सगळ्याना नवं प्रमोशन मिळालं...१९ तासाहून जास्त काळ मी त्या खोलीत कळा सोसल्या होत्या पण आता मात्र त्या खोलीत एक वेगळेच चैतन्य पसरलं होतं... तुझ्या येण्यानं... तुझा जन्म नैसर्गिक झाला, अगदी कळा वैगेरे सोसून... मला हवा होता अगदी तस्सा... ११ तारखेचे तुझ्या काकाचे लग्न, घरातली लग्नानंतरची पूजा सगळे सगळे काही सुरळीत पार पडलं....आणि मग तुझा जन्म झाला ... तू कुणाचीही अडचण होऊ न देण्यासाठीच जणू काही एवढे दिवस जन्म घ्यायला थांबलास की काय ...

आमूला पत्रे क्रमांक ४

Image
प्रिय आमुस, आजच्या पत्राचा विषय खास आहे बरं का; कारण आज मी तुला तुझा जन्म कसा झाला ही गोष्ट सांगणार आहे. गोष्टी ऐकायला तर तुला खूप खूप आवडतात हे माहित आहे मला.... हो की नाही? मग आज काऊ चिऊच्या गोष्टीपेक्षा तुझीच गोष्ट ऐक ...गोष्ट आहे आमुच्या जन्माची... सुधरुढ बाळाला जन्म घेण्यासाठी ४० आठवडे पुर्ण करावे लागतात. माझी ३९ व्या आठवड्याची मिड वाइफ अपॉयंटमेंट होती दुपारी दोन ची.... मी आणि बाबा बरोब्बर वेळेत तिथे पोहोचलो पण हॉस्पिटलच्या खाली पार्किंग मिळायला ५-६ मिनिटे गेली... आणि मी साधारण २ वाजून १० मिनिटांनी चेक अप वॉर्ड ला पोहोचले. आता ९ महिने ९ दिवस पुर्ण भरलेली मी धड भरभर चालुही शकत नव्हते. पण इकडचे नियम फार काटेकोर पाळतात आणि त्यावेळी माणुसकीही बाजूला ठेवतात हा अनुभव मला आला. फक्त १० मिनिटे उशीर झाला असला तरी ही मला पुढची अपॉयंटमेंट दिली गेली. मी त्यांना म्हटलं की दहाच मिनिटे उशीर झालाय जरा समजून घ्या ना. पण पुढच्या पेशंटना वेळ दिली आहे असे ती सरळ कोरडेपणाने सांगून निघून गेली. अश्या ठिकाणी आपली डिलिव्हरी होणार ह्या विचारानंच कापरं भरलं हो...

आमूला पत्रे क्रमांक ३

Image
प्रिय आमुस, मला माहित आहे बरेच दिवस तुला पत्र लिहूच शकले नाही... थोडं बरं नव्हतं रे ...अरे आई आजारी पडली की सगळे घर आजारी पडते... आईला कधी आराम करायची सवलतच देवबाप्पा देत नाही बघ. कारण का माहित आहे तुला; आरे आपण सगळी देवबाप्पाची लेकरं ना.... आणि जिथे जिथे बाप्पा पोहूचु शकत नाही ना तिथे तिथे बाप्पा "आई" नेमतो.... मग आईला आजारी पडायला अधिकार कोण देणार? हो ना ... तरीही थोडिशी विश्रांती घेऊन मी परत तुझ्याशी खेळायला हजर.... चल आता तुला पुढची गोष्ट सांगते बरं का... तुझ्या जन्माला अजून २० आठवडे तरी अवकाश होताच... माझी नोकरीही शेवटच्या टप्प्यात होती... तुझ्या जन्माआधी माझे कॉन्ट्रॅक्ट संपणार होते आणि कॉन्ट्रॅक्टवर असल्यामुळे हवीतेव्हा सुट्टीची सवलत नव्हतीच...घरातले सगळे आटपून २५ किलोमीटर गाडी चालवत जायचे आणि यायचे... आणि वाढलेले पोट स्टेरिंग व्हील वर घट्ट चिकटत असे आणि तुला फिरायला पोटात जागा कमी पडली की तुझी चुळबुळ चालू..आरे जरा शांत हो आईला गाडी तर चालवू दे असे सांगत सांगत माझा रोजचा प्रवास चाले.... मला कामावर सगळे गमतीत म्हणत की दीड माणसाला कामावर ठेऊन ए...

आमूला पत्रे क्रमांक २

Image
प्रिय आमुस वाट पहात होतास का रे आईच्या पत्राची? मला ही खूप बोलावेसे वाटत होते रे तुझ्याशी... कित्येकदा मला जेहि सांगायचे असते ना तुला ते सगळे समजवायला मी तुझ्या मनाशी असा मनाने संवाद साधला तर तुला लवकर उमगेल का?... कारण की; आपल्या मनाची नाळ जोडली होती ना रे.. तू पोटात आलास ना माझ्या; अगदी त्याही फार आधीपासून असेल बघ.... आपण दोघे असा मनाने संवाद का साधू शकतो माहित आहे कारण; माझ्या आतून तू माझ्या हृदयाचे ठोके ऐकले आहेत; आणि तुझ्या हृदयाची स्पंदने मी ऐकली आहेत... म्हणूनच तर आपल्या मनाची नाळ जोडलीय..... तुझ्या अस्तित्वाची चाहूल जेव्हा आम्हाला लागली ना; तेव्हा कित्ती कित्ती आनंद झाला सांगू तुला..अगदी तुला आकाशात विमान दिसले की होतो ना त्यापेक्षाही खूप जास्त.... कारण् तू येणार होतास ना आमच्या आयुष्यात....आमचे प्रतिरूप... माझी आणि बाबाची लहानगी छबी .... आनंद, उत्सुकता, नाविण्य, सगळे खुप खुप दाटून आलेले पण ..... माझे बाबा म्हणजे तुझे आजोबा खुप खुप आजारी पडले भारतात आणि त्यामुळे तुझ्या आजीला येता येईना माझ्याजवळ.... तुझ्या बाबाच्या घरूनही कुणाला येणे शक्य नव्हते...

आमूला पत्रे क्रमांक १

Image
प्रिय आमु, अरे ह्ळु ह्ळु... तू तर चार वर्षांचा झालास पण....अरे आत्ताच तर पिलूसा होतास रे तू... किती रे भरभर सरकत जाताएत रे हे दिवस... अगदी तुझ्या त्या लाडक्या मेरी गो राउन्ड सारखे... मला जरा ओंजळीत पकडायला तरी दे की रे हे क्षण....अरे तुझ्या एनर्जी बरोबर पळताना आईची दम छाक होते रे .... आणि मग तुला ह्ळूच कळत्ं की आई दमली आहे आणि शांत बसलेल्या मला तू जेव्हा जवळ येऊन विचारतोस ना, "काय झाल ग् आई" तेव्हा एकदम शंभर ह्त्तीचे बळ येते बघ मला.. असे म्हटले जाते की आई हा बाळाचा पहिला गुरु असतो... असेलही पण तू माझा गुरु आहेस हे नक्की ... माझ्या आईपणाचा.... तू माझ्या आयुष्यात येण्याआधी स्वयंपाक पण येत नव्हता बघ मला... बाबाला विचार किती बेचव स्वयंपाक व्हायचा बघ माझा.. ना पाण्याचा अंदाज ना मीठाचा... कोणी जेवायला येतय ह्या विचारानेच माझ्या पोटात गोळा यायचा. चार माणसांना जेवायला बोलावले की जेमतेम दोन माणसांना पुरेसे बनायचे आणि परत वाढू का विचारायची कोण पंचाईत असायची रे माझी. कारण एकदा वाढूनच बरचसं "संपा" ना रे.... एकदा बाबाचा मित्र यायचा होता जेवायला. मी नुकतीच ऑस्ट्रेलिया मधे आल...