Posts

Showing posts from April, 2020

करोना आणि आम्ही ऑस्ट्रेलियन

Image
माझं घर आहे ऑस्ट्रेलियाच्या  राजधानीमध्ये म्हणजेच कॅनबेरा मध्ये. मी शाळेत लायब्ररीअन आहे आणि वीकेंडला कत्थक  डान्सस्कुल चालवते. कम्युनिटी रेडिओवर मी रेडिओ जॉकी म्हणूनही काम करते. दोन दहा वर्षाच्या आतील मुलांची आई पण आहे. त्यामुळे माझा दिवस हा नेहमीच विमानाचे पंख लावल्यासारखा.  करोनाचा झटका खरंतर पचनी पडणारा नव्हताच माझ्या. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच स्कॉट मॉरिसनच्या ऑस्ट्रेलियन सरकारने दक्षता घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा आम्हाला ऑस्ट्रेलियनना ती बंधनं पचणारी नव्हतीच. तशीही बंधनं कोणाला हवी असतात. आम्ही लॉक डाउनच्या पहिल्या फेज मध्ये होतो. आमच्या शाळा पुपील फ्री करण्यात आल्या. म्हणजे शाळेत मुलांना पाठवायचं कि नाही हा निर्णय पालकांचा. पण शाळा चालू ठेवल्या होत्या प्रत्येक इसेन्शिल वर्कर साठी. आणि जो पगार घेतो आणि स्वतःचा उदर्निवाह करतो तो प्रत्येक जण इसेन्शिअल कामाच्या यादीतला.  पहिल्यांदा आम्हाला मॉरिसन सरकारचा खूप राग आलेला पण आता त्याच्या गोष्टी काहीप्रमाणात पटल्याहि. कोविड१९ चे चटके जगाच्या इकॉनॉमीला बसण्या आधीच ऑक्टोबर १९ पासून ऑस्ट्रेलियाची इकॉ...