असाही एक स्वातंत्र्यदिन......
आजची सकाळ काही अफलातून वेगळी वाटली मला... कधी नव्हे ते मी २६ जानेवारीला मी खऱ्या अर्थाने सुट्टी एन्जॉय करायचं ठरवलं आणि म्हटलंआज पांघरुणात लोळत न पडता घराच्या बाहेर पडून एकटंच सव्वीस जानेवारी एन्जॉय करायचा... नवऱ्याचा आळस रंगात आलेला; मुलं सुस्तावलेलीम्हणजे हाच तो क्षण होता जो माझा "मी टाईम" होता... मस्त चहा आणि लोणीपाव खाऊन मी निघाले. खरं तर लोणीपाव आणि चहा आयुष्यातूनसुटून एक तप लोटल्यात जमा आहे आणि जेव्हा दीक्षित आणि दिवेकर तुमच्या कॅलरीज आणि पोटाचे इंच आपल्याकडूनच कचाकच मोजून घेतअसतांना हे असं सगळं खाणं म्हणजे चैन असते फक्त... तरी आज काहीतरी वे...